'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी जॅकी चॅन मुंबईत

Santacruz, Mumbai  -  

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात आलाय. तो सध्या 'कुंग फू योगा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आहे. या वेळी तो 'दी कपिल शर्मा शो' मध्येही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

त्याचा कुंग फू योगा हा सिनेमा 27 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्टॅनले टोंगने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अभिनेता सोनू सुद, अभिनेत्री दिशा पटनी आणि अमायरा दस्तूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकतेच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या निमंत्रणानंतर अमेरिकेचा स्टार विन डिझेल मुंबईत आला होता. त्याचा ‘xxx दी रिटर्न ऑफ एक्झेंडर केज’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यामुळे एक गोष्ट मात्र वारंवार समोर येतेय ती म्हणजे परदेशी कलाकारांनाही भारतीय मार्केट महत्त्वाचे वाटत आहे.

Loading Comments