Advertisement

‘हॅप्पी’साठी जस्सी शिकला मंदारीन


‘हॅप्पी’साठी जस्सी शिकला मंदारीन
SHARES

काही कलाकार सिनेमांमधील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतो, तर कोणी घटवतो. कोणी लुकवर मेहनत घेत घेतं, तर कोणी बोलीभाषेवर... ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ या सिनेमासाठी गायक-अभिनेता जस्सी गिल चीनमधील मंदारीन भाषा शिकला आहे.


१५ दिवस घेतलं ट्रेनिंग

इरॅास इंटरनॅशनल आणि कलर यलो प्रोडक्शनची निर्मिती असलेली ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ हा सिनेमा ‘हॅप्पी भाग जाएगी’ या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल आहे. गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जस्सी गिलचा अभिनेत्याच्या रुपातील हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. यात त्याने चीनमध्ये राहणाऱ्या पंजाबी तरुणाची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी जस्सीने १५ दिवस मंदारीन भाषेचं ट्रेनिंग घेतलं.

'हा' अनुभव अविस्मरणीय

मंदारीन शिकण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचं जस्सीचं म्हणणं आहे. तो म्हणतो की, मंदारीन शिकणं खूप कठीण काम आहे. त्यामुळे ही भाषा बोलणं दूरच राहिलं. सुरुवातीला ही भाषा समजून घेणं कठीण गेलं. मी शब्दांचा योग्य उच्चार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी इंग्रजी सबटायटल्ससोबत मंदारीन भाषेतील काही व्हिडिओही पाहिले. मंदारिन शिकल्यानंतर शूटिंगपूर्वी मी उच्चारांवर लक्ष केंद्रित केल्याने काम सोपं झालं. मला पंजाबी सिनेमांमध्ये काम करायला आवडतं. बॅालिवूडचा भाग होणं हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं जस्सी मानतो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा