Advertisement

काजोलचा मुलगा 'क्रिश' आता काय करतोय?

'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा आठवतोय का? त्यात काजोल च्या मुलाची भूमिका साकारणारा क्रिश ही नक्कीच आठवत असेल. आता हा क्रिश मोठा झाला आहे आणि लवकरच तो करण जोहरसोबत कामही करणार आहे.

काजोलचा मुलगा 'क्रिश' आता काय करतोय?
SHARES

तुम्हाला 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा आठवतोय का? त्यात काजोल च्या मुलाची भूमिका साकारणारा क्रिश ही नक्कीच आठवत असेल. आता हा क्रिश मोठा झाला आहे आणि लवकरच तो करण जोहरसोबत कामही करणार आहे. जिब्रान खान असं त्याचं नाव असून ‘कभी खुशी कभी गम’चा दिग्दर्शक करण जोहरच आता त्याचा मार्गदर्शक होणार आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, जिब्रान करणच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करणार आहे.



जिब्रानला अभिनय क्षेत्रात आधीपासूनच आवड असून चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो मार्शल आर्ट्स, कथ्थक आणि घोडेस्वारीसुद्धा शिकला आहे. एवढंच नाही, तर कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स स्टुडिओमध्ये त्याने नृत्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ हा ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चा सर्वात मोठा चित्रपट असून त्याचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जिब्रानची निवड झाली आहे, असं समजतंय. जिब्रानने करण जोहरला चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्यासाठी तो पूर्णपणे तयार झाला नसल्याचं सांगत करणने सहाय्यक दिग्दर्शनाचं काम त्याच्याकडे सोपवलं आहे.



या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असून रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या टीमसोबत जिब्रानने कामालाही सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा