फुगे चित्रपटाच्या ट्रेलरला जॉनची हजेरी

  मुंबई  -  

  दादर - फुगे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दादर इथल्या शिवाजी मंदिरात लाँच करण्यात आला. सिनेमाच्या ट्रेलर लाँचला बॉलिवुडचा हॅण्डसम हंक जॉन अब्राहमनं उपस्थिती लावली होती. या चित्रपटात सचिन जोशी आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भमिका आहेत. "फुगे चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं माझ्यासाठी मोठी पर्वणीच आहे. स्वप्नीलनं चित्रपटाची कथा लिहली असून आम्ही प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येतोय. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे," असं सुबोध भावे यांनी सागितलं.

  सिनेमातील पोस्टरच्या रंगबेरंगी फुग्यांप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलरही कलरफुल आहे. ज्यात एका बाजूला दोन मित्रांची दोस्ती आहे तर दुसरीकडे हळूच फुलणारी लव्हस्टोरीही आहे. हा चित्रपट स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकार झालाय. या सिनेमाचे संकलन क्षितिजा खंडागळे यांनी केलंय. प्रेमाची हटके बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा २ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.