Advertisement

तापसी पन्नू म्हणते गुस्सा नई होने का!


तापसी पन्नू म्हणते गुस्सा नई होने का!
SHARES

'चश्मेबद्दूर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तापसी पन्नूला खरी ओळख 'पिंक' या चित्रपटामुळे मिळाली. 'पिंक' चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे आणि अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले. त्यानंतर तापसीच्या पदरी 'रनिंग शादी डॉट कॉम' आणि नाम शबाना असे चित्रपट पडले. आत्तापर्यंत तिने साकारलेल्या भूमिका या गंभीर होत्या. पण आता तापसी डेविड धवन यांच्या 'जुडवा-२'मधून एक वेगळी भूमिका साकारत आहे. 'जुडवा-२' गमतीदार आणि रोमँटिक चित्रपट असल्याने तापसीची भूमिका देखील मजेशीर आहे. बॉलिवूडमधल्या या बिनधास्त अभिनेत्रीशी 'मुंबई लाइव्ह'ने केलेली ही खास बातचित...


एका हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणे किती कठिण आहे?

'जुडवा' चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणे माझ्यासाठी कठिण किंवा आव्हानात्मक नव्हते. माझ्यासमोर फक्त एकच आव्हान होते आणि ते म्हणजे जॅकलिन आणि वरूणसमोर टिकून राहणे. मला कोणत्याच गोष्टींची कधी भिती वाटली नाही आणि वाटणार नाही.डेविड धवन यांच्यासोबत तू याआधीही काम केले आहेसयामुळेच 'जुडवा-२' चित्रपटासाठी तुझी निवड झाली?

मी हे तर नाही सांगू शकत की डेविड धवन यांनी माझी का निवड केली. याचे उत्तर डेविड धवनच देऊ शकतात. पण मी त्यांच्यासोबत यापूर्वीही काम केले आहे. त्यांना माझ्या कामाची, अभिनयाची जाणीव आहे. त्यामुळेच माझी निवड त्यांनी केली असावी.


'जुडवा' चित्रपट किती वेळा बघितला आहेस?

'जुडवा' चित्रपट मी टीव्हीवर पाहिला आहे. पण 'जुडवा-२' साइन केल्यानंतर मी एकदाही तो चित्रपट पाहिला नाही. कारण चित्रपट पाहिला असता, तर मी तसाच अभिनय करण्याचा प्रयत्न केला असता.बिकिनी घातल्यावर तुला ट्रोल करण्यात आले होतेतू कशाप्रकारे हे प्रकरण हाताळलेस?

तुम्हाला कुणी मारले म्हणून तुम्ही त्याला पलटून मारायचे नसते. मग तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नसतो. नकारात्मक टीकांवर मी कधीच चिडत नाही. तुम्ही गमतीदार पद्धतीने देखील उत्तर देऊ शकता. माझ्या बिकिनी अवतारातील फोटोंवर अनेकांनी ट्रोल केले. पण त्या दिवशी माझा मूड चांगला होता. त्यामुळे मी खूप गमतीदार उत्तरे देत होते


'जुडवा' आणि 'जुडवा-२' चित्रपटात काय बदल आहे?

वीस वर्षांनंतर 'जुडवा-२' चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळे स्टोरीसोबतच ट्रीटमेंटमध्येदेखील बदल पहायला मिळेल. 'जुडवा-२'मध्ये मुलींची भूमिका वेगळी आहे. 'जुडवा-२'मधल्या भूमिका या अधिक बोल्ड आणि बिनधास्त दाखवण्यात आल्या आहेत. फक्त ५-६ सीन जुडवा चित्रपटातील आहेत तसेच ठेवण्यात आले आहेत.यापूर्वी तू गंभीर भूमिका साकारल्या आहेसमजेशीर भूमिका करण्याचा विचार कसा केलास?

एकाच प्रकारच्या भूमिका करून कंटाळा येतो. एकवेळ दर्शक मला एकाच प्रकारच्या भूमिकेत पाहू शकतील. पण मी कंटाळले असते. म्हणून म्हटलं काही तरी नवीन करूया. होप सो प्रेक्षकांना माझी नवीन भूमिका आवडेल. यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे.


वरूणसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

वरूणसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. पण वरूण खूप चिंता करतो. प्रत्येक गोष्टीचा तो खूप विचार करतो. त्याला मी बऱ्याचदा सांगितलं की, शांत हो, मजा कर. तरी तो चिंताग्रस्तच असतो. पण एक आहे, तो कामाच्या प्रती खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याचा सक्सेस ग्राफ खूप चांगला आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement