मुंबईत जस्टिन बीबर फिव्हर - डी वाय पाटील स्टेडियमवर परफॉर्मन्स

 Navi Mumbai
मुंबईत जस्टिन बीबर फिव्हर - डी वाय पाटील स्टेडियमवर परफॉर्मन्स
Navi Mumbai  -  

लोकप्रिय पॉपस्टार जस्टिन बीबर हा आपल्या आयोजकांसह मुंबईत दाखल झाला आहे. 23 वर्षाचा जस्टिन बीबर मंगळवारी रात्री दीड वाजता चार्टर्ड विमानाने कलिना विमानतळावर पोहचला. तो जसा एअरपोर्टवर दाखल झाला तोच त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते विमानतळाच्या बाहेर उभे होते.

जस्टिन बुधवारी 10 मे रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये पहिल्यांदाच परफॉर्म करणार आहे. या शोमध्ये जस्टिनच्या सोबत प्रसिद्ध गायक एलन वॉकर देखील परफॉर्म करणार आहे.   

 

असा असेल पूर्ण कार्यक्रम

दुपारी तीन वाजता प्रवेशद्वार प्रेक्षकांसाठी उघडले जाईल

संध्याकाळी 4 वाजता डीजे सार्टेक परफॉर्म करेल

संध्याकाळी 5 वाजता डीजे जेडेन परफॉर्म करेल

'फेडेड' गाण्याने प्रसिद्ध झालेला डीजे वोक्स उर्फ एलेन वॉकर संध्याकाळी 6 वाजता डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये परफॉर्म करेल

रात्री 8 वाजता जस्टिन बीबर स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी येईल

Loading Comments