रंगकर्मी प्रतिभा अग्रवाल यांचा गौरव

BDD Chawl
रंगकर्मी प्रतिभा अग्रवाल यांचा गौरव
रंगकर्मी प्रतिभा अग्रवाल यांचा गौरव
रंगकर्मी प्रतिभा अग्रवाल यांचा गौरव
See all
मुंबई  -  

वरळी - रंगभूमीच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या 86 वर्षीय रंगकर्मी डॉक्टर प्रतिभा अग्रवाल यांना शनिवारी आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा अग्रवाल यांना तीन लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देण्यात आलं. लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, पं. शिवकुमार शर्मा, पं. बिरजू महाराज, हबीब तन्वर आदी मान्यवरांनाही या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

या वेळी 'शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाटक, संगीत, नृत्य याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक शहर आणि उपनगरांत मुक्त सांस्कृतिक केंद्रं असावी,' अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.