Advertisement

कन्नड सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं निधन

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

कन्नड सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं निधन
SHARES

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकुमार जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यांच्या निधनानं कर्नाटकात शोककळा पसरली आहे. तेथील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली असून शहरातील काही भागांत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात भेट दिली.

पुनीत यांचे वडील राजकुमार दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आयकॉन होते. पुनीत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

पुनीत यांना दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीनं बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'पुनीत राजकुमारचा आकस्मिक मृत्यू ही एक शोकांतिका आहे. आपल्यापैकी कोणीही कधीही मरू शकतो हे एक भयानक आणि डोळा उघडणारे सत्य आहे. आपल्यापैकी कधीही कुणीही मरू शकतो. त्यामुळे फास्ट फॉरवर्ड मोडवर जीवन जगणे उत्तम.'

पुनीत राजकुमार कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे.

१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी पुनीत यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

तसंच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.

पुनीत हे 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अप्पू' या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू, अंजनी पुत्र हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.



हेही वाचा

नेटफ्लिक्सवरील 'Squid Game' का ठरतोय लोकप्रियं?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा