कपिल शर्माचा माफीनामा, सुनील ग्रोव्हरची नाराजी

 Mumbai
कपिल शर्माचा माफीनामा, सुनील ग्रोव्हरची नाराजी
Mumbai  -  

मुंबई - 'द कपिल शर्मा शो'ची लोकप्रियतेच्या शिखरावर वर्णी लागत असतानाच कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात सध्या ऑल इज वेल नसल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियाहून परतताना विमान प्रवासात कपिलने सुनीलला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हातही उचलला असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सध्या कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेला वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगत आहे.

कपिलला आपली चूक कळताच त्याने फेसबुकवरून सुनीलला उद्देशून एक मॅसेज शेअर केला. "पाजी, नकळत मी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू जाणतोच. मी पण दु:खी आहे. तुझ्यासाठी कायम प्रेम आणि आदर असेल,” असं ट्वीट कपिल शर्माने केलं होतं.

याला सुनील ग्रोव्हरनेही ट्विटरवरून सौम्य शब्दात प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.


“भाई तू मला फारच दुखावलं आहेस. तुझ्याकडून मी खूप शिकलो. तुला केवळ एक सल्ला देतो, तू प्राणीप्रेमी आहेस. जनावरांसारखे माणसांवरही प्रेम कर. सगळेच तुझ्यासारखे यशस्वी नाहीत. तुझ्यासारखे टॅलेंटेडही नाहीत. जर सगळेच तुझ्याएवढेच टॅलेंटेड झाले तर तुझी कदर कोण करेल? त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव असू दे आणि जर कोणी तुझी चूक दाखवत असेल तर त्याचा अपमान करू नकोस. शिवाय काही महिला ज्यांना तुझ्या स्टारडमशी काहीही देणं-घेणं नाही, त्यांच्यासमोर अभद्र भाषा वापरू नको. हा तुझा शो आहे आणि तू कोणालाही, कधीही शोमधून बाहेर काढू शकतोस हे जाणवून दिल्याबद्दल तुझे आभार. तू तुझ्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहेस. पण देवासारखं वागू नको. स्वत:ची काळजी घे. तुला यश आणि प्रसिद्धी मिळो यासाठी माझ्या शुभेच्छा,” असे ट्विट सुनीलने केले. 

Loading Comments