SHARE

मुंबई - सलमान खान आणि शाहरुख खान हे साजीद नाडियाडवालाची निर्मिती असणाऱ्या नव्या कलाकृतीद्वारे 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळत आहे. मात्र साजीद नाडियाडवालाने या दोघांना एकत्र आणण्यापूर्वीच हे अवघड काम कबीर खाननं साध्य केलं आहे. कबीरचं दिग्दर्शन आणि सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'ट्युबलाईट' चित्रपटाचं सध्या वेगानं चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटासाठी कबीरनं शाहरुखला साईन केलं आहे. कबीरनं दिलेल्या माहितीनुसार शाहरुख या चित्रपटात एक कॅमिओ रोल साकारीत आहे. सलमान आणि शाहरुखनं यापूर्वी 'करण अर्जुन', 'हम तुम्हारे है सनम', 'कुछ कुछ होता है' आदी चित्रपट केले आहेत. येत्या जुलै महिन्यात 'ट्युबलाईट' प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या