रुपेरी पडद्यावर करण-अर्जुन पुन्हा एकत्र दिसणार

 Pali Hill
रुपेरी पडद्यावर करण-अर्जुन पुन्हा एकत्र दिसणार
रुपेरी पडद्यावर करण-अर्जुन पुन्हा एकत्र दिसणार
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक कबीर खान यांच्या 'ट्यूबलाइट' सिनेमात एकत्रित अभिनय करताना दिसतील. सलमान खान फिल्म्स (एसकेएफ) चे सीईओ अमर बुटाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की भारताचे दोन सुपरस्टार जेव्हा सेटवर असतील तेव्हा जादूच होईल. ट्यूबलाईटला आणखी खास बनवण्यासाठी त्यांनी या वेळी शाहरुखचे आभारही मानले. किंग खान या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून अभिनय करणार आहे.

सलमान आणि शाहरुख पहिल्यांदा 21 वर्षापूर्वी राकेश रोशन दिग्दर्शित करण अर्जुन या सिनेमात एकत्रित दिसले होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. या व्यतिरिक्त दोघांनी 'कुछ कुछ होता है' आणि 'हम तुम्हारे है सनम' या सिनेमात एकत्रित अभिनय केलं होतं. तर 'हर दिल जो प्यार करेगा' मध्ये शाहरुखने छोटीशी भूमिका निभावली होती.

ट्यूबलाईट या सिनेमाचं शूटिंग लेह-लडाख आणि मनालीत होत आहे. या सिनेमात दिवंगत अभिनेता ओम पुरी हेही अभिनय करताना दिसतील. तर रिअॅलिटी शो 'बिग बॉस 10' मध्ये शाहरुख आणि सलमान ही जोडी धमाल करताना दिसतील. या वेळी शाहरुख आपल्या रईस या सिनेमाचा प्रमोशन करताना दिसेल.

Loading Comments