करण जोहरची संपत्ती शाहरुखच्या मुलांच्या नावे?

 Mumbai
करण जोहरची संपत्ती शाहरुखच्या मुलांच्या नावे?
Mumbai  -  

मुंबई - बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करण जोहर आपली संपत्ती आपल्या आणि काही संपत्ती शाहरुख खानच्या मुलांच्या नावे करणार असल्याचं समोर आलंय. करण आपल्या संपत्तीचा काही वाटा शाहरुखच्या तिन्ही मुलांच्या नावे करणार आहे. 

या सर्व प्रकारानंतर करण जोहर आणि शाहरुखमधील घनिष्ट मैत्री पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. करण जोहरचं शाहरुखच्या तिन्ही मुलांवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी करण जोहर सरोगेसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता झाला. त्याला एक मुलगी आणि मुलगा झाला आहे. त्याने त्याच्या मुलीचं नाव रुही आणि मुलाचं नाव यश ठेवलंय. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरावरुन रुही हे नाव ठेवलंय. या सर्व प्रकारामुळे यापूर्वीही करण चर्चेत आला होता.

Loading Comments