कॅट-डिप्स पुन्हा आमने-सामने

 Mumbai
कॅट-डिप्स पुन्हा आमने-सामने
Mumbai  -  

मुंबई - कॅटरिना कैफ आणि डिप्स अर्थात दीपिका पदुकोण पुन्हा एकदा आमने-सामने आल्या आहेत. पण या वेळी त्या दोघी एका चित्रपाटाच्या निमित्ताने समोरासमोर आल्या आहेत. कबीर खान यांच्या आगामी सिनेमासाठी या दोघी अभिनेत्रींना एकमेकींचं तोंड पाहावं लागत आहे.

कबीर खान यांनी त्यांच्या आगामी सिनेमात अभिनेता ऋतिक रोशनला साइन केलंय. त्यामुळे ऋतिकसोबत काम करण्यासाठी या दोघींमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

पण आता कबीर खान त्यांच्या चित्रपटात या दोघींपैकी कुणाला साईन करतील हे औत्सुक्याचं ठरणार आहे.

यापूर्वी अभिनेत्री कतरिनाने बँग बँग आणि जिंदगी न मिलेगी दोबारा या सिनेमात ऋतिकसोबत अभिनय केलाय.

Loading Comments