मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कैफचा चित्रपट 'जग्गा जासूस' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा एक फोटो कॅटने तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. फोटोसोबत तिने एक कविताही लिहली आहे. आयुष्याच्या प्रवासात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत, असे कॅप्शनही तिने फोटोला दिले आहे. तसेच परिवारासोबत ‘जग्गा जासूस’च्या जगाची सैर करा, असेही कॅटने लिहले आहे.