कट्यार काळजात घुसली अव्वल

 Goregaon
कट्यार काळजात घुसली अव्वल
कट्यार काळजात घुसली अव्वल
कट्यार काळजात घुसली अव्वल
See all
Goregaon , Mumbai  -  

गोरेगांव - मराठी फिल्मफेअर अॅवॉर्ड्स गोरेगावच्या फिल्मसिटीमधील रिलायन्स स्टुडिओमध्ये रविवारी रात्री पार पडला. 2016 च्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात बाजी मारली आहे कट्यार काळजात घुसली, ख्वाडा या सिनेमांनी.

उत्कृष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर (कट्यार काळजात घुसली ), उत्कृष्ठ अभिनेत्री मुक्ता बर्वे ( डबल सिट ), उत्कृष्ठ सिनेमा 'कट्यार काळजात घुसली', उत्कृष्ठ दिग्दर्शक सुबोध भावे ( कट्यार काळजात घुसली) अशी बरीच अॅवॉर्डस कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या खात्यात पडली.

या सोहळ्याला मराठी सिनेकलाकारांसोबतच बॉलिवूडमधील दिग्गजही उपस्थित होते. यामध्ये अनिल कपूर, विवेक ओबेरॉय सोनाली बेंद्रे आणि आलिया भट यांसारखी मंडळी उपस्थित होती.

Loading Comments