शाहरुखच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा प्रारंभ

 Bandra west
शाहरुखच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा प्रारंभ
Bandra west, Mumbai  -  

वांद्रे - विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृदयांतर' या मराठी सिनेमाचा मुहूर्त 10 डिसेंबरला पार पडला. या सिनेमाच्या मुहूर्त अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते करण्यात आला.

हा मराठी सिनेमा 2017 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेळी अर्जुन कपुरनं नारळ फोडून शुभारंभ केला. त्यानंतर सोनाली खरे आणि मुक्ता बर्वे यांनी चित्रपटाच्या पहिल्या शॉट रेकॉर्डिंगसाठी अभिनय केला. 25 वर्षांपासून फॅशन दुनियेत काम करणाऱ्या विक्रम फडणीस यांनी हृद्यांतरसाठी अनुवाद लिहिलेत. दैनंदिन जिवनावर आधारित या सिनेमाची कथा आहे. या मुहूर्ताला अब्बास मस्तान, सुहैल खान, मलाईका अरोरा या बॉलिवूड स्टार्सनी देखील हजेरी लावली होती. या सिनेमाद्वारे फडणीस दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. याआधी त्यांनी बॉलिवूडमधील निया या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं होतं.

Loading Comments