साला मै तो बाप बन गया!

 Andheri
साला मै तो बाप बन गया!
Andheri, Mumbai  -  

मुंबई - बॉलिवुड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सरोगेसीच्या मदतीने बाप झाला आहे. त्याला एक मुलगी आणि मुलगा झाला आहे.  आपण बाप झाल्याचं त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जाहीर केलंय. 


त्याच्या मुलांचा जन्म अंधेरीच्या मसरानी हॉस्पिटलमध्ये 7 फेब्रुवारीला झाला. त्याने त्याच्या मुलीचं नाव रुही आणि मुलाचं नाव यश ठेवलंय. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवलंय. या आधी शाहरुख खानही सरोगेसीच्या मदतीने बाप झाला होता. तर, अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीने बाप झाला होता. या लिस्टमध्ये आता करण जोहरच्या नावाचाही समावेश झाला आहे. 

Loading Comments