लावणी सम्राज्ञीच्या स्मृतीदिनी ‘विठा’ टीमचं अभिवादन

 Mumbai
लावणी सम्राज्ञीच्या स्मृतीदिनी ‘विठा’ टीमचं अभिवादन
लावणी सम्राज्ञीच्या स्मृतीदिनी ‘विठा’ टीमचं अभिवादन
लावणी सम्राज्ञीच्या स्मृतीदिनी ‘विठा’ टीमचं अभिवादन
See all
Mumbai  -  

मुंबई - लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिम्मित नारायणगाव येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होत. दरम्यान निर्माते दिनेश अग्रवाल यांनी रुग्णसेवा करण्याच्या हेतूने नारायणगावमध्ये विठाबाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार असल्याचे जाहीर केले. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?’  या विठाबाईंच्या लोकप्रिय लावणी गीतांवर त्यांची कन्या आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी स्वतः गात नृत्य सादर केले. या वेळी 'विठा' या सिनेमाचे निर्माते दिनेश अग्रवाल, शुभदा भोसले, दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे, अश्विनी शेंडगे, विठाबाई यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
विठाबाईंचा तमाशासृष्टीतील प्रवास हा अत्यंत खडतर आणि संघर्षमय होता. मात्र त्यांनी प्रत्येक संघर्षाला मोठ्या हिमतीने तोंड देऊन तमाशा या लोककलेवर निस्सीम प्रेम केले. विठाबाईंचा खडतर जीवन प्रवास हा प्रत्येक कलावंताला एक आदर्श आहे, अशा विठाबाईंची भूमिका साकारायला मिळणेखरोखरच एक मोठे आव्हान होतं, अशी भावना ‘विठा’ या आगामी मराठी चित्रपटात विठाबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे यांनी नारायणगाव येथे व्यक्त केली. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात विठाबाईंच्या आयुष्यावर बेतलेला ‘विठा’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Loading Comments