Advertisement

याला म्हणतात महिला दिन सेलिब्रेशन!


याला म्हणतात महिला दिन सेलिब्रेशन!
SHARES

८ मार्चला महिना दिन प्रत्येक महिलेने आपल्या परीने साजरा केला. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही काही मागे नव्हते. या कलाकारांनी महिला दिनानिम्मित्त अशी कलाकृती सादर केली आहे, ज्याची आठवण प्रेक्षकांना प्रत्येक महिला दिनी येईल!

'होणार सून मी' म्हणत प्रेक्षकांच्या घरात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी प्रेक्षकांची लाडकी सून तेजश्री प्रधानचा 'अनकम्फर्टेबल' हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या अडीच मिनिटांच्या लघुपटात पुरूष केवळ त्यांच्या नजरेतून स्त्रियांना अनकम्फर्टेबल  करतात. हेच या लघुपटातून अगदी उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे.


 

तर 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून निगेटिव्ह भूमिका असतानाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिज्ञा भावे हिने आपल्या स्टाईलने महिला दिन साजरा केला आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेनं त्यांचा 'स्वयंभू' हा महिला दिन विशेष व्हिडिओ लाँच केला आहे. अभिज्ञाने केलेला हा व्हिडिओ महिलांसाठी खास गिफ्ट ठरणार आहे.


याशिवाय, आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. आजपर्यंत तिने अनेक गाणी मराठी चित्रपट सृष्टीत गायली आहे. सावनीने 'वुमन्स डे'च्या निमित्ताने रसिकांसाठी एक खास भेट आणली आहे. 'वुमन्स डे'च्या दिवशी सावनीने तिचा नवाकोरा व्हिडिओ भेटीला आणला आहे. सावनीने या गाण्याद्वारे समाजात स्त्रियांबद्दलचा आदर आणि स्त्रियांची समाजात असलेली गरज मांडली आहे.


 हेही वाचा

महिला दिनाबाबत काय म्हणतायत मराठी कलाकार?


संबंधित विषय
Advertisement