Advertisement

महिला दिनाबाबत काय म्हणतायत मराठी कलाकार?

आम्हीही घराण्याचं नाव उज्ज्वल करू शकतो. आईवडिलांचा आधार होऊ शकतो. देशाची शान बनू शकतो. म्हणूनच मुलींनो..स्त्री असल्याचा अभिमान बाळगा, जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पुढे जायचं आणि इतरांसाठी ढाल बनायचं.

महिला दिनाबाबत काय म्हणतायत मराठी कलाकार?
SHARES

आज 8 मार्च..सगळीकडेच माहिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यामध्ये आपली कलाकार मंडळीही मागे नाहीत. महिला दिनाबद्दल तुमच्या लाडक्या कलाकारांचं काय म्हणणं आहे, जाणून घेऊया...



तितिक्षा तावडे (सरस्वती ) - स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान बाळगा !

“मला स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याबद्दल मी नाखूष आहे वा मला तक्रार करावीशी वाटते. आजच्या दिवशी माझा स्त्रियांना एकच संदेश असेल..कोणासाठी वा कशासाठी कधीही स्वत:ला बदलू नका. ज्याक्षणी तुम्ही स्वत:वर प्रेम कराल आणि आनंदी रहाल त्या क्षणापासून तुम्हाला दुसऱ्यांसाठी काही करण्याची वा स्वत:ला बदलण्याची गरज भासणार नाही”.



ऋजुता देशमुख (आवली - तू माझा सांगाती) - महिलांकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक!

महिलांकडे बघण्याचा महिलांचाच दृष्टीकोन काही ठिकाणी बदलायला हवा. आपणच एकमेकींना साथ दिली तर कदाचित वर तोंड करून आपल्याला विरोध करणाऱ्यांची वृत्ती कमी होण्याची शक्यता आहे. महिला म्हणून आपण वैविध्यपूर्ण भूमिका प्रेमानी पार पाडतो. एखाद्या परिस्थितीकडे भावूक पद्धतीने बघतो आणि ताकदीनिशी आपलं नाव व्यवसायात देखील कमावतो. या सगळ्यामुळे महिला असल्याचा मला अभिमान वाटतो.



भाग्यश्री लिमये (अमृता घाडगे - घाडगे & सून) - इतरांची ढाल बनायचं!

मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण मला घरातून कधीही मुलगी आहे म्हणून दुय्यम वागणूक मिळाली नाही. उलट माझे सर्व लाड माझ्या आई बाबांनी पुरवले. आपली मुलगी जगात सक्षमतेनं वावरू शकली पाहिजे यासाठी योग्य ते शिक्षण दिले. आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सर्वांना असं सुचवावसं वाटतं की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्याचबरोबर आम्ही मुली स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत. आम्हीही घराण्याचं नाव उज्ज्वल करू शकतो. आईवडिलांचा आधार होऊ शकतो. देशाची शान बनू शकतो. म्हणूनच मुलींनो..स्त्री असल्याचा अभिमान बाळगा, जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पुढे जायचं आणि इतरांसाठी ढाल बनायचं.



चिन्मय उदगीरकर (अक्षय घाडगे - घाडगे & सून) - स्त्री ही सगळ्याच बाबतीत पुरुषापेक्षा श्रेष्ठ!

स्त्री ही सगळ्याच बाबतीत पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. सहनशीलता, परिस्थितीशी जुळवून घेणे, माणसा-माणसातील नातेसंबंध टिकण्याच्या दृष्टीने जो समंजस स्वभाव लागतो या सगळ्या अनुषंगाने. आज जी अराजकता वाढली आहे त्यावर मात करण्यासाठी त्यावरचा उपाय शोधण्यासाठी संयम, सहनशीलता, समजूतदारपणा, सर्वसमावेशकता हे गुण महत्वाचे आहेत आणि याचं मूर्तीमंत प्रतिक म्हणजे 'स्त्री'. स्त्री सर्वार्थाने समाजाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तसेच नवनिर्मितीचा अधिकार देखील देवाने स्त्रीला दिला आहे. त्यामुळे स्त्रियांनी खंबीरपणे प्रत्येक बिकट क्षणाला सामोरं जावं. तिला कोणाच्याही सहानुभूतीची, आधाराची गरज नाही.



सचित पाटील (प्रेम देशमुख - राधा प्रेम रंगी रंगली) - पुरूषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवावी

महिला दिन एकाच दिवशी साजरा न होता तो खरंतर रोज साजरा व्हायला हवा. इतकं महिलांचं महत्व आहे. आज मी जे काही आहे, ते माझ्या आई, माझी बहीण आणि माझी बायको शिल्पामुळेच आहे. जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो, तेव्हा त्याच्यामागे महिलांचं योगदान असतं. मला महिलांना नाही, तर पुरूषांना संदेश द्यावासा वाटतो. पुरुषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.



वीणा जगताप (राधा देशमुख - राधा प्रेम रंगी रंगली) - धीट बना

Women is Attitude and Woman is Gratitude.. या वर्षी महिला दिनानिमित्त मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की धीट बना! देवाने स्त्रीला सगळ्यात मोठा हक्क दिला आहे तो म्हणजे एका दुसऱ्या जीवाला या जगात आणण्याचा. म्हणजे स्त्रीमध्ये किती सामर्थ्य, किती शक्ती असेल याची जाणीव ठेवा आणि तसं आलेल्या समस्यांना सामोरं जा. आपल्याला स्त्री जन्म लाभला आहे हे आपलं भाग्य आहे.



हेही वाचा

ऋता दुर्गुळेचा आगळा वेगळा महिला दिन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा