लेफ्ट राइट लेफ्ट...

 Santacruz
लेफ्ट राइट लेफ्ट...

कलिना - यंदाची अमर हिंद एकांकिका स्पर्धा गाजवणाऱ्या अहमद शेख यांच्या निर्मितीतून आणि जागर आर्ट फॉर नेशन प्रस्तुत प्रसाद थोरवेद्वारा लिखित आणि दिग्दर्शित एक दर्जेदार कलाकृती म्हणजे लेफ्ट राइट लेफ्ट. वैचारिक दीर्घांक 'लेफ्ट राइट लेफ्ट' हे नाटक शनिवार 17 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता मुंबई विद्यापीठ, कलिना येथील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्युटमधील सरस्वती सभागृहात रंगेल. या नाटकाचं आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मुंबई विद्यापीठानं केलं असून प्रवेश विनामूल्य असेल. देशात नक्षलवाद कसा वाढतो आहे, हे या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Loading Comments