Advertisement

न्यू रेझोल्युशन इंडिया संस्थेचा वर्धापन दिन सोहळा


न्यू रेझोल्युशन इंडिया संस्थेचा वर्धापन दिन सोहळा
SHARES

दादर - विदयार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी 'न्यू रेझोल्युशन इंडिया' या संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रवींद्र नाट्य मंदिरात संस्थेच्या वतीने सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपरिक नृत्य, संगीत, नाटक आदींची मनोरंजनात्मक मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वरिष्ठ निरीक्षक मुंबई रेल्वे महिला आणि बालविकास विभाग मृदुला दिघे, सचिव महाराष्ट्र नशाबंदी महामंडळ वर्षा विद्या विलास, लेखिका डॉ. विजया लाड आदी मान्यवर उपस्थित होते. 2009 साली न्यू रेझोल्युशन इंडिया या संस्थेची स्थापना झाली आणि आज पर्यंत शाळा ते झोपडपट्टी विभागात काम करत आहे. 'कनेक्टिंग एज्युकेशन टू एमप्लॉईमेन्ट' हे व्हिजन घेऊन संस्थेची कारकीर्द सुरु झाली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा