Advertisement

ही 'लूजर वाली गरबा स्टेप' काय भानगड आहे भाऊ?


ही 'लूजर वाली गरबा स्टेप' काय भानगड आहे भाऊ?
SHARES

सध्या सोशल मीडिया हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सामान्य लोकांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळेच आपल्या आयुष्यातील खास क्षण सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. मग ते फेसबुक असो इंस्टाग्राम किंवा मग ट्विटर. सगळीकडेच कलाकारांच्या आयुष्यातील काही गोष्टी बघायला वाचायला मिळतातच. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
तेजस्विनीच्या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिने पाहिलेली एक गरबा स्टेप आहे, जी तिने गेल्या वर्षी गरबा खेळताना पहिली होती. तिच्या त्या स्टेपला ती तिची 'लूजरवाली गरबा स्टेप' म्हणते आहे. एवढंच नाही, तर तिने तिची मैत्रिण नम्रता आवटे - सांभेराव आणि सिद्धार्थ जाधव या दोघांना लूजर वाली स्टेप करण्यासाठी चॅलेंज ही केलं आहे.
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर 'लूजरवाली गरबा स्टेप' असा हॅशटॅग वापरून व्हिडीओ शेअर करायचा ट्रेंड सुरु झाला आहे. तेजस्विनीने दिलेलं चॅलेंज सिद्धार्थ आणि नम्रताने स्वीकारून त्यांनीही त्यांची 'लूजर वाली गरबा स्टेप' शेअर केली आहे!आता सगळेच ही 'लूजरवाली गरबा स्टेप' शेअर करत आहेत म्हटल्यावर अभिनेता उमेश कामत तरी कसा मागे रहाणार? त्यानेही मग आपली लूजरवाली गरबा स्टेप शेअर केली आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा