Advertisement

'हम गया नही जिंदा है...'


'हम गया नही जिंदा है...'
SHARES

माहीम - श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित “हम गया नही जिंदा है...” हे महानाट्य सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत प्रथमच सादर झाले. २८ आणि २९ जानेवारीला माहीम पश्चिम बसडेपोच्या बाजूला असलेल्या मच्छिमार कॉलनी जवळील मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदानात सायंकाळी ६.३० वाजता नाट्याचा प्रयोग झाला.

या नाटकाचे लेखन, संयोजन, गीत, संगीत, दिग्दर्शन दास दिगंबर यांचे आहे. स्वामी समर्थांची भूमिकाही दास दिगंबर यांनीच साकारली आहे. 2 हजार 400 चौरस फुटांचा भव्य रंगमंच असून 125 कलाकारांचा यात सहभाग आहे. हे महानाट्य जाणता राजा या महानाट्याहून भव्यदिव्य आहे. गोंधळ, पालखी, वासुदेव, जोगवा, कव्वाली, पोवाडा, खेळनृत्य, जाखडी नृत्य अशा प्रकारचे संगीत आणि नृत्य पहायला मिळते. यात रत्नागिरीतील गावखडी, चिपळूण आणि मुंबईच्या कलाकारांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा