संस्कृती पुनरूज्जीवनाचं 'महानाट्य'!

 M. I. G. Cricket Club
संस्कृती पुनरूज्जीवनाचं 'महानाट्य'!
M. I. G. Cricket Club, Mumbai  -  

मुंबई - महाराष्ट्र विविध कला-संस्कृतीनी नटलेला प्रांत आहे. याच महाराष्ट्रात हल्ली ऱ्हास होतोय तो तिथल्या लोकसंगीताचा, सणवारांचा आणि तिथल्या चालीरितींचा. म्हणूनच राज्याच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या या दैदीप्यमान कलेला तंत्रज्ञानाची जोड देऊन लोककलांना पुनरूज्जीवित करण्यासाठी अरविंद जोग फाउंडेशनच्या संकल्पनेतून महानाट्य घडविण्याच्या संकल्पनेस सुरूवात झाली आहे. शुक्रवारी वांद्रे पूर्व इथल्या एमआयजी क्लबमध्ये या संकल्पनेची सुरूवात झाली. नोव्हेंबरपर्यंत रसिकांना रंगमंचावर हे महानाट्य पाहायला मिळणार याची घोषणाही यावेळी झाली.

या महानाट्याद्वारे जमा होणारा निधी अरविंद जोग यांच्या फाऊंडेशनतर्फे राज्यातील विविध कानाकोपऱ्यात दडलेल्या संस्कृती आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता खर्च केला जाणार आहे. विविध कलाकारांना त्यांच्या कलाकृती साकारण्याची संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध लोककलांचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या उद्देशाने जोग फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे.

Loading Comments