Advertisement

बिग बॉसमध्ये राजकारणी मांजरेकर

लोकसभेची निवडणूक जवळ आल्यानं आज सगळीकडं निवडणुकीचं वातावरण आहे. अशातच कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांनीही राजकारण्यांचा वेष धारण केला आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची तयारी आता सुरू झाली आहे.

बिग बॉसमध्ये राजकारणी मांजरेकर
SHARES

दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण करत असतात. ठराविक गॅपनंतर आपला गेटअपही बदलत असतात. आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वासाठी ते राजकारणी बनल्याचं पाहायला मिळणार आहे.


दुसऱ्या पर्वाचंही सूत्रसंचालन

लोकसभेची निवडणूक जवळ आल्यानं आज सगळीकडं निवडणुकीचं वातावरण आहे. अशातच कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांनीही राजकारण्यांचा वेष धारण केला आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची तयारी आता सुरू झाली आहे. पहिल्या पर्वात सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलनं ज्यांनी प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांचीही मनं जिंकली ते मांजरेकर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार आहेत. 


लुक लक्ष वेधणारा

मांजरेकरांनी नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शूट केला आहे. या प्रोमोमध्ये ते राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसणार आहेत. त्यामुळं या वेळेस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना! असा प्रश्न सुजाण प्रेक्षकांना पडणं सहाजिक आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सीझनची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणत्या ख्यातनाम व्यक्ती दिसतील याविषयाच्या तर्क-वितर्कांनाही सुरुवात झाली आहे, पण या शोचा हुक असलेल्या मांजरेकरांनी सर्वांवर कढी करत बाजी मारली हे खरं. मांजरेकरांचा नवा लुक लक्ष वेधून घेणारा आहे.हेही वाचा -

रणबीर बनला सुपरपॅावर असलेला डीजे!

रुपेरी पडद्यावर माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर
संबंधित विषय
Advertisement