• अमेय वाघचं लग्न!
SHARE

'मुरांबा' सिनेमा रिलीज झाल्यापासून अमेय वाघच्या फॅन फॉलोविंगमध्ये बऱ्याच मुलींची वाढ झाली होती. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच अमेय लग्नबेडीत अडकणार आहे. आणि हे स्वतः त्याने सोशल साईटवर सांगितलंय. फक्त सांगितलंच नाहीये, तर त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटोही त्याने शेअर केलाय .

"गेली १३ वर्षे ती मला सहन करते आहे आणि यानंतरही ती माझ्यासोबत सुखाने राहू शकेल, असे तिला वाटते. तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत आणि मलाही शुभेच्छा द्याव्यात ", असे अमेयने या पोस्टमध्ये लिहिले आहे.साजिरी देशपांडे असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. अमेयने साजिरीसोबतचा एक फोटो शेअर करुन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात होण्यासाठी आता केवळ १२ दिवस राहिले असल्याचे सांगितले आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून अमेय घराघरात पोहचला होता. पण हल्लीच रिलीज झालेला 'मुरांबा' सिनेमामुळे त्याचा चाहता वर्ग नक्कीच वाढला होता. त्याबरोबर त्याचं 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटकही सध्या जोरात सुरु आहे. पण अमेयच्या लग्नाच्या बातमीने तरुणींचा हिरमोड झाला असेल हे नक्की.

संबंधित विषय
ताज्या बातम्या