Advertisement

पूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ

चहूबाजूंनी कचाट्यात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी मराठी सिनेसृष्टीतील उदयोन्मख अभिनेते हरिओम घाडगे यांनी मदतयज्ञ सुरू केला आहे.

पूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ
SHARES

कोकणातील पूर आणि दरड कोसळण्याच्या दुर्दैवी घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या हरिओम यांनी सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली आहे. उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीर्ण वास्तूचा उद्धार करत वस्तुसंग्रहालय उभारण्याचे कामही हाती घेतले आहे. 

जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावासमुळे आलेला महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांचा फटका कोकणातील दुर्गम भागांना बसला आहे. महाड, पोलादपूर, चिपळूण भागातील कडेकपाऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये आर्थिक नुकसानासोबतच जीवितहानीही झाली आहे. आस्मानी संकटामुळे बरेच संसार उघडल्यावर आले आहेत. 

चहूबाजूंनी कचाट्यात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी मराठी सिनेसृष्टीतील उदयोन्मख अभिनेते हरिओम घाडगे यांनी मदतयज्ञ सुरू केला आहे. हरिओम यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हरिओम' या मराठी चित्रपटाचे शुटिंग कोकणातच करण्यात आले असून, चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी त्यांनी उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीर्ण वास्तूचा उद्धार करत वस्तुसंग्रहालय उभारण्याचे कामही हाती घेतले आहे. 'हरिओम' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

कोकणातील पूर आणि दरड कोसळण्याच्या दुर्दैवी घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या हरिओम यांनी सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली आहे. यावेळी हरिओमसोबत चित्रपटातील सहकलाकार गौरव कदम, उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, नायब तहसीलदार देसाई, पंकज पटेल, गोपीचंद्र घाडगे, विठोबा रेणोसे, श्रद्धा जगताप, प्रतिष्ठानचे सचिव परमेश्वर तांगडे, बाबू पार्टे, किरण जेदे आदी मंडळी होती.

 हरिओम यांनी स्वत:कडील मदतीसोबत कांदिवली व उपनगरांमधील नागरिकांकडून साहित्यरूपी मदत गोळा केली. महाड, चिपळूण, खेड, पोलादपूरमध्ये गोवेले, उमरठ, खोपड, केवनाळे या गावांतील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत जीवनोपयोगी वस्तूंसह, भांडी, कपडे, चादरी, चटई, मच्छर अगरबत्ती, प्रथमोपचाराची औषधे, मेणबत्त्या, सोलार व बॅटरी लॅम्प्स अशा विविध वस्तूंचे वाटप केले. पोलादपूरमधील ग्रामीण भागातील कोलमडलेली विद्युत यंत्रणा दुरुस्त करण्याकरीता अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कामही हाती घेतले आहे. 

कोकणातील पूरग्रस्त दौऱ्यावर जाऊन तिथल्या नागरिकांना मदत करण्यापूर्वी हरिओम, गौरव आणि तांगडे यांनी पोलादपूर भागात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे जखमी झालेल्या नागरिकांची केईएम आणि जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शेजारच्या घरातील दोन महिन्यांच्या बाळाला वाचवण्यासाठी गेलेल्या केवनाळे गावातील साक्षी दाभेकर या १४ वर्षांच्या उदयोन्मुख खेळाडूला या दुर्घटनेत आपला पाय गमवावा लागला. साक्षी आणि तिच्या कुटुंबियांना धीर देत हरिओम यांनी त्यांनाही मदत केली. हरिओम आणि त्यांच्या टीमने हे काम निस्वार्थ भावनेतून केले आहे. या मदतयज्ञात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हरिओमने मनापासून आभार मानले आहेत.

 बॅालिवूडच्या मदतीची गरज नाही 

कोकणात आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बॅालिवूडमधील कोणत्याही कलाकाराने पुढाकार न घेतल्याची खंत हरिओम यांनी व्यक्त केली आहे. हरिओम म्हणाले की, मराठी माणूस कोणाच्या मदतीची अपेक्षा करत नाही. कोकणी माणूस स्वत: खंबीर आहेच, पण त्या सोबतच स्वाभिमानीही आहे. महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करत असून, उपजिल्हाधिकारी व सरकारी यंत्रणा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरता तळमळीने काम करत आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही दळणवळणाची साधने, साकव, नद्यांच्या दोन तीरांना जोडणारे वाहून गेलेले छोटे पूल बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जेसीबीसह पोकलेनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असून, रात्रंदिवस मदतकार्य वेगात सुरू आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा