Advertisement

अर्जुन रामपालच्या 'डॅडी'मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे!


अर्जुन रामपालच्या 'डॅडी'मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे!
SHARES

मराठी सिनेसृष्टीतील बरेच नावाजलेले कलाकार हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नशीब आजमवतात. या यादीत राजेश शृंगारपुरे हे नाव आधीपासूनच दाखल झालं होतं. राजेश आता पुन्हा आपल्याला बॉलिवूडमध्येही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित 'डॅडी' या सिनेमात राजेश महत्वाची भूमिका साकारणार आहे.

'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये राजेश चांगल्या भूमिका साकारताना पहायला मिळाला आहे. 'झेंडा' या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. राजेश शृंगारपुरे आपल्याला कायम धडाकेबाज भूमिका साकारताना दिसला. राजेशने मराठीसोबतच 'सरकारराज', 'मर्डर थ्री' या हिंदी सिनेमांत देखील कामे केली आहेत. 


मराठी तसेच हिंदी सिनेमा असो किंवा छोटा पडदा असो, ही दोन्ही माध्यमे गाजवलेल्या राजेशने दोन हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. त्याच्या या सिनेमातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. 'डॅडी' या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले. 'अरुण गवळी' यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'डॅडी' या सिनेमात राजेश शृंगारपुरे एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.हेही वाचा

उमेश कामत होणार डॉक्टर!


संबंधित विषय
Advertisement