Advertisement

'सुबोध भावे' आता ढोलकी वादकाच्या भूमिकेत


'सुबोध भावे' आता ढोलकी वादकाच्या भूमिकेत
SHARES

'हृदयांतर', 'तुला कळणार नाही' अशा सिनेमांमुळे चर्चेत असलेला अभिनेता सुबोध भावे लवकरच 'छंद प्रितीचा' या सिनेमातून नव्या भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित 'छंद प्रितीचा' हा आगामी सिनेमा लवकरच आपल्यासमोर दाखल होणार आहे.

या सिनेमात सुबोध भावे आपल्याला 'राजाराम' नामक एका ढोलकी वादकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं आपण याआधी देखील 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातून पाहिलं आहे. संगीताचा कोणताही प्रकार असो, सुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाण आता आपणांस पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'छंद प्रितीचा' हा सिनेमा येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा