Advertisement

अमेरिकेत अश्विनी भावेंनी फुलवली फळाफुलांची बाग!


अमेरिकेत अश्विनी भावेंनी फुलवली फळाफुलांची बाग!
SHARES

मातीचं घर, घरापुढे अंगण, अंगणात छोटी तुळस आणि सोबतीला इतर रोपं, हे असं चित्र आपल्याला मुंबईत पाहायला मिळणार नाही. आणि मिळालंच तर ते गावीच. थोडक्यात काय, तर सुरुवातीला सगळीकडे दिसून येणारी 'अंगण' संस्कृती हळूहळू लोप पावत नंतर नाहीशीच होत गेली. पण आपली हीच संस्कृती एका मराठी अभिनेत्रीने पुन्हा जिवंत केली आहे आणि ते ही भारताबाहेर! अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात या ‘अंगण संस्कृती’चं जतन केलं आहे. ‘परसातल्या भाज्या’ ही पारंपारिक पद्धत त्यांनी अमेरिकेत तयार केली आहे.



गेली काही वर्ष त्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि तो किती यशस्वी झाला हे लोकांनी पाहावं म्हणून अश्विनी भावे यांनी आपल्या फेसबुकवर ‘द ग्रीन डोअर’ हा नवीन टॅग सुरु केलाय.




अश्विनी यांनी आपल्या अमेरिकेतील राहत्या घरी मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग तयार केली आहे आणि याच भाज्या त्यांच्या नेहमीच्या स्वयंपाकाचा भाग असतात. आजकाल वाढत चाललेला निसर्गाचा लोप हे या मागचं कारण आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.



आजकालच्या पिढीला निसर्गाचं महत्त्व पटवून देईल, अशी ही मोहीम आहे. अमेरिकेसारख्या प्रगतीशील देशामध्ये राहूनही अश्विनी भावे यांनी आपलं मराठीपण जपलं. याच बागेमधील भाज्या त्यांच्या घरी आणल्या जातात. सध्या या 'द ग्रीन डोअर' मोहिमेला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या बागेमध्ये आलेल्या 'मॅग्नोलिया' या सुंदर फुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.




या मोहिमेबद्दल बोलताना त्या सांगतात कि, 'प्रत्येकाची श्रीमंतीची कल्पना वेगळी असते आणि ही बागच माझी श्रीमंती आहे' संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ घालून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. आणि या उपक्रमाला त्यांचे चाहते उत्तम प्रतिसादही देत आहेत.



हेही वाचा

जॉन अब्राहमने रिक्षातून केला प्रवास!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा