दीप्ती बनली रेडिओ जॉकी!

 Mumbai
दीप्ती बनली रेडिओ जॉकी!
Mumbai  -  

मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दीप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हे वाचून धक्का बसला असेल ना? म्हणजे अभिनेत्री असणारी दीप्ती अचानक आरजे का झाली? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण काळजी करू नका. दीप्ती अजूनही अभिनेत्रीच आहे. पण आता ती तुम्हाला आरजेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. दीप्तीच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर आगामी 'कंडिशन्स अप्लाय-अटी लागू' हा मराठी चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.

या चित्रपटात दीप्ती ‘आरजे’ स्वरा हळदणकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘आरजे’च्या भूमिकेत शिरलेली दीप्ती सांगते की, ‘आरजे’ची भूमिका ही चॅलेंजिंग व तितकीच इंटरेस्टिंग असते. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते. या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पहाते, यावर 'कंडिशन्स अप्लाय' हा सिनेमा भाष्य करतो.

'कंडिशन्स अप्लाय' मध्ये दीप्ती देवीसोबत सुबोध भावे, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय पवार यांचे आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित हा चित्रपट ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading Comments