Advertisement

सईने पटकावला सॅव्ही पुरस्कार!

रविवारी पुण्यात झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये सईला ‘आऊटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सॅव्ही पुरस्कार पटकावणारी सई मराठीतली पहिली अभिनेत्री ठरली आहे.

सईने पटकावला सॅव्ही पुरस्कार!
SHARES

सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कारावर अभिनेत्री सई ताम्हणकरने आपलं नाव कोरलं आहे. पेज-थ्री आणि बॉलिवूड सेलेब्सना दिला जाणारा फॅशन जगतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा मानाचा पुरस्कार सईला मिळणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.


मराठीतली पहिली अभिनेत्री

रविवारी पुण्यात झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये सईला ‘आऊटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सॅव्ही पुरस्कार पटकावणारी सई मराठीतली पहिली अभिनेत्री ठरली आहे.आजवरच्या कार्याचा गौरव

सईने आपल्या १० वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीतील करियरमध्ये जवळजवळ ५० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच नावाजलेल्या पुरस्कारांसोबत सॅव्ही पुरस्कार मिळणं हा तिच्या आजवरच्या कार्याचा गौरव असल्याचं मानलं जात आहे.


आत्मविश्वास दुणावला

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सई म्हणली की, "मी खूप खूश आहे. स्वत:ला भाग्यवान समजते. मी एक स्वतंत्र स्त्री आहे, जी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. सॅव्हीने दिलेल्या या पुरस्काराबद्दल मी आभारी आहे. अशा पुरस्कारांमुळे आत्मविश्वास दुणावतो. कौतुकाची ही थाप काम करण्यासाठी नवी उर्जा प्रदान करते. ही केवळ सुरूवात आहे. कुटुंबाला आणि चाहत्यांना गर्व वाटावा, असंच काम यापुढेही करत राहीन.”विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावले

या सोहळ्यात विद्या बालनला भेटण्याची संधी सईला मिळाली. याबाबत सई म्हणाली की, “मी खरं तर विद्याला पहिल्यांदाच भेटले. पण माझ्याशी बोलताना तिच्या नजरेत असलेला परिचयाचा भाव, तिने माझे चित्रपट पाहिले असल्याचा विश्वास देऊन गेला. ही माझ्यासाठी खूप मोठी क़म्पिलिमेंट होती. सशक्त महिलेचं प्रतिक असलेल्या विद्याला भेटताक्षणीच तिच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले.”हेही वाचा-

जिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती

अपेक्षांची वेस न ओलांडलेला ‘रेस’संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा