मराठमोळी सई झळकणार टॉलिवूडमध्ये !

 Mumbai
मराठमोळी सई झळकणार टॉलिवूडमध्ये !
Mumbai  -  

हल्ली बरेच कलाकार एकाच भाषेपुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या भाषेतील सिनेमे करताना पाहायला मिळतात. जसं बरेच हिंदी कलाकार आता मराठी सिनेमात पाहायला मिळू लागले आहेत. मराठी सिनेमातली अभिनेत्री सई ताम्हणकर ही लवकरच आपल्याला टॉलिवूड सिनेमात पाहायला मिळणार आहे. सई ताम्हणकर या आधी आपल्याला हिंदी सिनेमात ही दिसली होती. सईची वाढती लोकप्रियता आणि अर्थात तिचं काम पाहून आता तिला थेट टॉलिवूड सिनेमात काम करण्याची ऑफर आली आहे.


बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित ‘सोलो’ या सिनेमात सई आपल्याला दिसणार आहे. हा सिनेमा तामिळ आणि मल्याळम भाषेत शूट करण्यात आला असून या चित्रपटाचा जॉनर फारच इंटरेस्टिंग असणार आहे, असं ही समजतंय. तामिळ सिनेमात गाजलेला अभिनेता दुल्कार सलमान या सिनेमात असून त्यानं या सिनेमाचं पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. सईनंही तिच्या चाहत्यांसाठी हेच ट्विट रिट्विट केलं आहे. सिनेमाचं नाव 'सोलो' असं असून रोमँटिक-थ्रिलर असलेल्या ‘सोलो’मध्ये आपली मराठमोळी सई नेमकी कोणती भूमिका साकारणार? हे लवकरच आपल्याला कळेल.हेही वाचा

हे आहेत मराठी सिनेमांमधील गाजलेले लिपलॉक


Loading Comments