Advertisement

'ब्रेव्हहार्ट - जिद्द जगण्याची : कहाणी प्रेरक पण सादरीकरण सुमार


SHARES

ह्या आठवड्यात म्हणजेच ७ एप्रिल ला रिलीज झालेला मराठी सिनेमा ' ब्रेव्हहार्ट - जिद्द जगण्याची ' हा आहे.

प्रत्येक सिनेमा सुरु होताना ' ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही, आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा ' अशी नोट आपल्याला वाचायला मिळते पण हा सिनेमा सुरु होताना तुम्हाला ते दिसणार नाहीहल्ली बरेच सिनेमे सत्यकथांवर आधारित असलेले आपल्याला पाहायला मिळतायत ' ब्रेव्हहार्ट - जिद्द जगण्याची ' हि कथा सुद्धा सत्य घटनेवर आधारित. सच्चीदानंद कारखानीस आणि निखिल कारखानीस ह्या बाप लेकाची त्यांच्या खऱ्या आयुष्याची हि कथा.

निखिल कारखानीस..नेहमी हसतमुख , प्रसन्न असलेला हा मुलगा , त्याला ट्रेकिंग करायला डोंगर दऱ्या पहायला खूप आवडत. असच एकदा ट्रेकिंग करत असताना त्याचा एक पाय दुखू लागतो हे निम्मित ठरत आणि डॉक्टर कडे गेल्या वर त्याला समजत कि लाखात एकाला होणारा आजार त्याला झालाय. आणि तिथून सुरु होते सिनेमाची खरी कथा.

निखिल ला एक असा आजार होतो ज्यात त्याच्या शरीराचा एक एक अवयव निकामी होत जातो. आई आणि आजोबांचं एकाच वेळी झालेलं निधन , स्वतःला झालेला असा आजार पण तो त्यावर ही मात करून त्याच उरलेले आयुष्य कस घालवतो , खचून न जाता आयुष्यातील अडचणींना कस सामोरं जातो हे बघताना प्रेक्षकांना हि कौतुक वाटेल . सिनेमातले काही प्रसंग तर खूप प्रेरणा देऊन जातात.इंटरव्हल पर्यंत सगळं सकारात्मक वाटत असताना इंटरव्हल नंतर मात्र सिनेमा प्रेक्षकांना धरून ठेवताना कमी पडतोय. 

निखिल कारखानीस म्हणजेच संग्राम समेळ चा हा पहिलाच सिनेमा असूनही त्याने त्याचा रोल चोख निभावला आहे. वडिलांच्या म्हणजेच सच्चीदानंद कारखानीस च्या भूमिकेत दिसणारा बाप अरुण नलावडे ह्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या भूमिकेला न्याय दिलाय. निखिल च्या बायकोची भूमिका धनश्री काडगावकर हिने साकारली असून तिनेही तिजी भूमिका चांगली निभावली आहे. 

चांगली कथा , चांगला अभिनय असुनही सिनेमा मनाला तितकासा भावत नाही.लग्नाआधी खूप चांगली वागणारी प्रेयसी अचानक निखिल आणि त्याच्या वडिलांशी का वाईट वागते ? सिनेमात निखिलच्या काकाची व्यक्तिरेखा का ठेवली आहे ? असे अनेक प्रश्न सिनेमा बघताना प्रेक्षकांना पडतील. लग्नानंतर चे प्रसंग बघताना टिपिकल सासू  सूनेच्या मालिका बघितल्या सारखा फील येतो आणि ती सत्य कथा आहे हे आपण विसरूनच जातो.

दुःखावर रडण्यापेक्षा कस हसावं  हे ह्या सिनेमात निखिल शिकवतो पण तरीही सिनेमा प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यात कमी पडतो. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा