राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी सिनेमांची बाजी

  Mumbai
  राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी सिनेमांची बाजी
  मुंबई  -  

  राष्ट्रीय पुरस्कार कुणाला मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतानाच शुक्रवारी 64व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारल्याचं चित्र दिसून येतय.

  सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार दशक्रिया या सिनेमाला मिळाला, तर हिंदी सिनेमात 'नीरजा'ने बाजी मारली. कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं आहे.

  त्याचबरोबर राजेश मापुस्करांच्या व्हेंटिलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून दशक्रिया सिनेमातील मनोज जोशी यांना पुरस्कार मिळाला.

  यावेळचा सर्वोत्तम अभिनेता म्हणून अक्षय कुमारला रुस्तम या सिनेमातल्या अभिनयासाठी मान मिळाला. तर दुसरीकडे नीरजा सिनेमातल्या सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

  राष्ट्रीय पुरस्कार 2017 चे विजेते

  राष्ट्रीय पुरस्कारात मराठी सिनेमानं मारली बाजी, 'कासव' ला सुवर्णकमळ!

  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया

  सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल

  सर्वोत्कृष्ट संकलन - व्हेंटिलेटर

  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा

  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )

  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मनोज जोशी ( दशक्रिया)

  सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग - व्हेंटिलेटर

  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - झायरा वासिम ( दंगल )

  सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक

  सर्वोत्कृष्ट अभिनेता - अक्षय कुमार (रुस्तम)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.