'बन मस्का' घेणार प्रेक्षकांचा निरोप?

  Mumbai
  'बन मस्का' घेणार प्रेक्षकांचा निरोप?
  मुंबई  -  

  चहा आणि बन मस्का…फाडू नुस्का, स्ट्रेस वरती गड्या... जगण्याचा लागे चस्का… जिंदगी से जब कनेक्शन हुआ…हे मस्त धमाल युवा गाणं आणि तेवढीच उत्तम आणि तरुणाईची धडकन बनलेली 'बन मस्का' ही मालिका पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. प्रेक्षकांची आवडती 'बन मस्का' ही मालिका, 9 जूनला झी युवावरून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे . या मालिकेने आजवर अनेकांचे हृदय जिंकले. यातील शिवराज आणि शिवानी  या दोघांनीही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सौमित्र आणि मैत्रेयी या पात्रांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.  मैत्रयीच्या आजीच्या भूमिकेतील ज्योती सुभाष यांना पाहून तर प्रत्येकालाच आपली आजी एवढीच कूल असावी ही भावनाही आली असेल. या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ते सौमित्रचे आई बाबा आणि भाऊ म्हणजेच राजू घटणे, अतिशा नाईक आणि आशुतोष गायकवाड असोत किंवा मैत्रियेचे आई बाबा म्हणजेच चिन्मयी सुमित, अभय असोत.  या सर्वांनी एक वेगळेच कनेक्शन प्रेक्षकांसोबत बनवले आहे.  'बन मस्का' मधील सौमित्र आणि मैत्रयीच्या मित्रांना विसरून कसं चालेल... रोकड्या, आदिल, चुंबक, ऋतुजा, ऐश्वर्या आणि अशीच अनेक पात्रे ज्यांनी ही मालिका अक्षरशः जिवंत केली. या सर्वांशिवाय ही मालिका यशस्वी होणे अशक्यच होते.

  या मालिकेत  आजच्या तरुणाईची  बोली भाषा लेखक संदेश कुलकर्णी आणि मनस्वी लता रवींद्र यांनी योग्य रित्या हेरली आहे. अनेक वेळा अतिशय स्पष्ट भाषा आणि त्याला सडेतोड अभिनय दाखवण्यात पोथडी एंटरटेनमेंटचे प्रोड्युसर आणि मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांचाही  मोठा हातभार आहेच. सध्या या मालिकेतील लव्ह ट्रँगल एका वेगळ्याच वळणावर आहे. एकीकडे पूर्व आयुष्यातील प्रेमाचा अतिरेक  एक विक्षप्त प्रेमी ने घाबरली आकृती म्हणजेच उर्मिला निंबाळकर तर सर्वच सुखी आयुष्य जगणारी पण आनंदी नसलेली मैत्रयी आणि त्यात अडकलेला सौमित्र अतिशय उमदे अभिनय करीत आहेत. 'बन मस्का' मध्ये सध्या तरुण वर्गातील प्रेम या भावनेतील वेगवेगळे पैलू पहायला मिळत आहेत.  ही मालिका 9 जूनपर्यंत सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी युवावर पाहायला मिळे .

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.