'जय मल्हार' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!

  Mumbai
  'जय मल्हार' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
  मुंबई  -  

  काही मालिका संपल्या तरीही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात असतात. झी मराठी वरील 'जय मल्हार' ही त्यातलीच एक मालिका. 'जय मल्हार' या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. हिंदी भाषेत ही मालिका झीच्या हिंदी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

  मूळ मराठी मालिकेचं हिंदीत डबिंग केलं जाणार आहे. हिंदीत डब होणारी 'जय मल्हार' ही पहिलीच मराठी पौराणिक मालिका असेल. मराठीतील भव्यता आता देशभरातील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

  महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. मल्हार अर्थात खंडेरायांची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाच्या भूमिकेतील सुरभी हांडे, बानूच्या भूमिकेतील इशा केसकर यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.