Advertisement

'कुंकू, टिकली आणि टॅटू'मध्ये २ महिन्यांचा अल्टिमेटम


'कुंकू, टिकली आणि टॅटू'मध्ये २ महिन्यांचा अल्टिमेटम
SHARES

कलर्स मराठीवरील 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेमध्ये सध्या रमाचं 'फॅमिलीएशन' सुरू आहे! रमा आणि राजचे लग्न झाल्यापासून रमाला कुलकर्णी घरातल्या सदस्यांचे विचार पटत नाहीत. कारण रमा आजच्या काळातील मुलगी आहे. स्त्रीवर कुठल्याही प्रकारे होणारा अत्याचार तिला मान्य नाही. कुलकर्णींच्या घरातील चालीरीती आपल्याशा करणे, त्यांचे नियम पाळणे, त्यांचा परंपरावाद समजून घेणे रमाला अवघड होऊन बसले आहे.दोन महिन्यांची मुदत

रमा आणि विभा, तसेच कुलकर्णी परिवार यांच्या विचारांत असलेली तफावत खूपच मोठी असल्याने रमा या घरामध्ये रहाण्यास तयार नव्हती. आणि तिने 'राजला आपण वेगळे राहू' असे देखील सांगितले. परंतु, यामध्ये विभा यांनीच सुवर्णमध्य काढला आणि रमा आणि राजला एक अट घातली, ज्यानुसार त्यांनी रमाला दोन महिन्यांची मुदत दिली. ज्यामध्ये एकतर त्या तरी बदलतील अथवा रमा तरी बदलेल. विभाच्या या अटीमुळे रमा-राजचे भवितव्य कसे बदलणार? पुढे काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

काही दिवसांपासून 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत, ज्यामध्ये महत्त्वाची म्हणजे विभाची दोन महिन्यांची अट रमाने स्वीकारली असून राज देखील खुश आहे. परंतु, घरामध्ये स्त्रियांप्रती असलेला पुरूषांचा आणि घरातीलच स्त्रियांचा दृष्टीकोन रमाला मान्य नाही, असे दिसून येत आहे.हेही वाचा

कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवीन कॅप्टन?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा