Advertisement

१२ मराठमोळ्या गायकांचं आगळं वेगळं 'महाराष्ट्र' गीत!


१२ मराठमोळ्या गायकांचं आगळं वेगळं 'महाराष्ट्र' गीत!
SHARES

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे 'माझा महाराष्ट्र' हे गीत. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. साधना सरगम, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी अशा एकसे बढकर एक गायकांचा त्यात समावेश आहे.



महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन या कलाकृतीद्वारे संपूर्ण महाराष्ट्राला घडणार आहे. प्रसिद्ध साऊंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते आहेत. शांतनू रोडे यांनी या गीताचं दिग्दर्शन केलं आहं. या गीताचं छायांकन आशुतोष आपटे यांचं आहे.

अभिजीत जोशी यांनी याआधी अनेक मराठी सिनेमांसाठी गीतकार-संगीतकार म्हणून काम केले आहे. यामध्ये 'हरी ओम विठ्ठला', 'अगडबंब', 'कामापुरता विमा', 'सुपारी पालखी', 'जयजयकार', 'लक्ष्मी येई घरा', 'हर हर महादेव' या चित्रपटांचा समावेश आहे. शंभरहून अधिक अल्बम, जिंगल्स आणि चित्रपट मिळून तीनशेहून अधिक गाणी अभिजीत जोशी यांच्या नावावर आहेत.


 



हेही वाचा

ऋषिकेश जोशी बनला वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा