आता घरबसल्या मिळवा नाटकाचं तिकीट

मुंबई - कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेले सिनेमे फ्लॉप झाल्याचं चित्र एकीकडे असताना दुसरीकडे नाट्यसृष्टीला मात्र सुगीचे दिवस आलेत. रसिक नाटकांना पसंती देत असल्याचं चित्र काही महिन्यांपासून पहायला मिळतंय. रसिकांची पसंती पाहून, नाटकांचं बुकिंग डिजिटली करण्याचा निर्णय मराठी नाट्य व्यावसायिक संघानं घेतलाय. विशेष म्हणजे बुकिंग घरबसल्या मोबाइलवर अगदी इंटरनेटशिवायही करता येणार आहे.

चलनातून 1000, 500 च्या नोटा बाद झाल्यामुळे नाट्यसृष्टीवर परिणाम झाला असला तरी, नाट्यरसिकांची नाटकांना मिळालेली पसंती कायमच आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि सांस्कृतिकमंत्र्यांनी बाद झालेल्या नोटा स्वीकारण्यास हिरवा कंदील दिल्यामुळं, नाट्यगृहांना थोडा का होईना दिलासा मिळालाय. एकंदरीतच काय, मराठी नाट्यसृष्टी डिजिटल झाल्यानं रसिकांना नाटकांचा मनमुराद आनंद घेण्यात अडचण येणार नाही, हे मात्र नक्की.

 

Loading Comments