Advertisement

सांगत्ये ऐका... - मयुरी देशमुख


सांगत्ये ऐका... - मयुरी देशमुख
SHARES

नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा अखंड जागर. अशाच एका महिला शक्तीची कहाणी आज आपण तिच्याचकडून ऐकणार आहोत. तिचं नाव आहे मयुरी देशमुख!


प्रश्न - मुंबई आणि तुझ्या नात्याबद्दल काय सांगशील ?

उत्तर - माझ्या बाबांची नोकरी फिरतीची असल्यानं लहानपणापासून मी पूर्ण राज्यभर फिरले. पहिलीपर्यंत पंढरपूर, दुसरी तिसरी चौथी पुण्याला मग नांदेड आणि सातवीपासून आम्ही मुंबईत रहायला आलो. मुंबईतलं आयुष्य खूप बिझी, धकाधकीचं असल्याचं आपण नेहमीच म्हणतो. असं असलं तरी मुंबई नेहमीच वास्तव्यासाठी माझी प्रायॉरिटी राहिली आहे. हे शहर तुम्हाला स्वप्नं बघायची हिंमत देतं. मी इतर कुठल्याही शहरात असले, मी जे काही निर्णय घेतले, जी काही हिंमत मिळवली, ते बळ मला या शहराने दिलं. माझा अॅटिट्युडही इथे राहून बदलला. मी जास्त लिबरल झाले, नॉन जजमेंटल झाले.



प्रश्न - मयुरी, यशाच्या शिखरावर पोहोचणं कोणत्याच कलाकारासाठी सोपं नाही. तुझ्यासाठी ते किती कठीण होतं? तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट कोणता ठरला?

उत्तर - मी काही कोणी ऐश्वर्या रॉय नाही, की मला वाटलं आणि लगेच मला मनासारखी कामं मिळतील. मला खरी परिस्थिती माहीत होती की आपण इथे आलो की आपल्याला स्वतःवर  काम करावं लागेल, स्वतःला ग्रूम करावं लागेल. माझ्याबाबतीत एक गोष्ट खूप चांगली झाली होती की आधीपासूनच मी जरा संतुलित असल्यामुळे मला आधीच कळलं, मला नक्की काय हवंय. मी क्राफ्ट च्या प्रेमात पडत गेले. मी मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केलं. शॉर्टकट आणि पटकन फेमने हुरळून जाणं, या गोष्टी आपोआपच गळून पडल्या. आणि थँकफुली जो तुमचा स्ट्रगलचा काळ असतो, जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, तो खरंतर बिल्डिंग ब्लॉक ठरला माझ्यासाठी. त्यामुळे माझे पेशन्स वाढले, माझी सहनशीलता वाढली, पटकन मिळालेलं यशाचं मला आकर्षण राहीलं नाही.



स्टारडम हॅण्डल करणं हेही एक टास्क असतं. कारण एका आठवड्यात तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं, तर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तीच लोकं विसरूही शकतात. इतकं हे क्षणिक आहे. आणि घरच्यांचं सांगायचं झालं तर 'कशाला हे करतेस? या क्षेत्रात काही शाश्वती नसते, आपल्या माहितीतली लोकं नाहीत.' त्यात एक्सप्लॉयटेशनबद्दल ऐकलेलं असतं आणि मध्यमवर्गीय कुटुंबात त्याबद्दल भीती असते. त्यामुळे मला विरोध होता, पण तो भीतीपोटी होता. जसजसा त्यांना माझा प्रवास दिसत गेला, तसतसं ते निश्चिंत झाले.



आधी मी या इंडस्ट्रीत खूप घाबरुन जायचे. 'हे काय म्हणतील?, त्यांना काय वाटेल?' असा विचार करायचे. या क्षेत्रातलं सुरुवातीला काही समजत नसल्याने 'हे म्हणतील ती पूर्वदिशा' असं म्हणतं पुढे जायचे. माझी एक क्रिएटिव्हिटी होती. बरेच लोक मला विरोध करत होते आणि सांगत होते तू वेगळ्या पद्धतीने कर. त्यावेळी माझं नाव ही नव्हतं. तरी मी माझ्या मतांवर ठाम राहिले. जेव्हा मी माझी संवेदनशीलता समजायला शिकले आणि जेव्हा माझ्यात हा केअरलेसपणा आला आणि मी ठरवलं कि लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा तोच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. मला वाटत या इंस्ट्रीमध्ये किंवा कुठेही कुणी तुमचं माय बाप नसलं, तरी आपल्यातल्या प्रत्येकाला आपलं डोकं असत, अक्कल असते. त्यामुळे कोणत्याच दबावाखाली न येता आपण अस्तित्व टिकवणं खूप महत्वाचं असतं.



प्रश्न - नवरात्र म्हणजे देवीचा सण. महिलेला पण आपण देवीचं रूप मानतो. नवदुर्गा म्हणून संबोधतो. या सगळ्याकडे तू कशी पाहतेस ?

उत्तर - काही ठिकाणी महिलेला खूप मान आणि दुसरीकडे तेवढीच खालच्या दर्जाची वागणूक. आपल्याकडे ही खूप तफावत आहे. अगदी मनोरंजन जगतात पण आपण पाहतो, महिलांपेक्षा पुरुष ओरिएण्टेड कामं जास्त पाहायला मिळतात. पण आता ही गोष्ट बदलत आहे. बऱ्याच मुलामुलींना एकट्या आईने वाढवलं आहे. त्यामुळे महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. जस थेंबे थेंबे तळे साचे असतं, तसंच हा बदलही हळूहळू का होईना होतोय.



प्रश्न - महिलांसाठी काय संदेश देशील ?

उत्तर - बाईचा जन्मच मुळात सॅक्रिफाइज घेऊन येतो. तू जेवलास का? तू हे काम केलंस का? हे असं विचारताना आपण बऱ्याच महिला पहातो. ते करायलाच हवं. मुळात काळजी घेणं हे महिलेला जमतंच. म्हणूनच ती महिला आहे, आई आहे. पण या सगळ्याबरोबरच आपण यात एक गोष्ट समाविष्ट करायला हवी, ती म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, स्वतःची निगा राखणं, म्हणजेच स्वतःवर खूप प्रेम करा आणि सुंदर आयुष्य जगा!



हेही वाचा

'ती' दिसते सनी लिओनी सारखी...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा