Advertisement

अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना गुरूवारी सकाळी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून धन्वंतरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक
SHARES

मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना गुरूवारी सकाळी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून धन्वंतरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सकाळी प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना अचानक फोर्टिसमध्ये हलवण्यात आलं.


सध्या काय स्थिती?

फोर्टिस रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात विजय चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत; परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. फोर्टिस रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांना कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. आयसीयू नंबर ३ मधील १३१० या बेडवर चव्हाण यांना ठेवण्यात आलं आहे.


अभिनयाचा ठसा

मराठी सिनेसृष्टीत विजूमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाण यांनी मराठी सिनेसृष्टीसोबतच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली मावशी, तसंच ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकातील अण्णा कायम स्मरणात राहणारे आहेत. आपल्या प्रदीर्घ सिनेकारकिर्दीत विजूमामांनी नायक, खलनायक, विनोदी अभिनेता, चरित्र अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत.



हेही वाचा-

विजय चव्हाण, म़णाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा