राम-लखन दोबारा!

  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईकरांचे मनोरंजन करणाऱ्या न्यू एक्सेलसियर या सिनेमागृहाने पुन्हा एकदा कात टाकली आहे. या सिनेमागृहाचा शुभारंभ सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने राम लखन चित्रपटाची जोडगोळी अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळाली.

  तसेच यावेळी अभिनेता अनुपम खेर, गुलशन ग्रोवर आणि सतीश कौशिक देखील उपस्थित होते. या सिनेमागृहात राम लखनचा प्रीमियर देखील दाखवण्यात आला. अनेक वर्षांनंतर या चित्रपटांची टीप पुन्हा एकदा एकत्र दिसली. दरम्यान अभिनेता जॅकी श्रॉफने पुन्हा राम लखनचा रिमेक झाला तर जुन्या टीम सोबतच व्हावा अशी इच्छा यावेळी व्यक्त केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.