Advertisement

मराठीतला भन्नाट कार व्हिडिओ 'माईम थ्रू टाईम'


मराठीतला भन्नाट कार व्हिडिओ 'माईम थ्रू टाईम'
SHARES

माईम थ्रू टाईम ही संकल्पना या आधी हिंदी, पंजाबी, मल्याळी, तेलगू, इंग्रजी भाषेत रूढ होती. आता ही संकल्पना मराठी कलाकारांनी वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये पहिल्यांदाच आणली आहे. पाडव्यानिमित्त पहिला माईम थ्रू टाईम हा कार व्हिडिओ मराठी भाषेत तयार करण्यात आला आहे.


प्रेक्षकांसाठी पर्वणीच

मराठी मध्ये या व्हिडिओची मुखवटे ए.सी.जे.एन यांनी निर्मिती केली आहे. तर या व्हिडिओचं दिग्दर्शन विनय प्रतापराव देशमुख यांनी केलं आहे. तर सुंदर गाण्यांना सागर जाधव यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. सध्या तरुणांमध्ये युट्यूबची जास्त क्रेझ आहे. शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, प्रॅन्क, व्हिडिओ बघणारा ऑडियन्स मोठा आहे. त्यामुळे माईम थ्रू टाईम हा व्हिडिओ मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.


माईम थ्रू टाईम या कार व्हिडिओमध्ये आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीतील तारका दिसणार आहेत. न्रमता गायकवाड, स्नेहा चव्हाण, चारू दिसणार आहेत. अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारे हा व्हिडिओ प्रेक्षकांसमोर आला आहे.


व्हिडिओची खासियत

या व्हिडिओची खासियत म्हणजे या संपूर्ण गाण्यामध्ये तिन्ही अभिनेत्रींचं १७ वेगवेगळे लूक्स बघायला मिळतात. या व्हिडिओत एकूण १५ गाणी आहेत. त्यात विशेष म्हणजे चार ते पाच मिनिटांच्या या गाण्यांमध्ये ५१ वेगवेगळे पेहराव आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा