राज ठाकरे आशुतोष गोवारीकरांना का भेटले?

आशुतोष गोवारीकर यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयात ही भेट झाली. यावेळी अभिनेता अर्जुन कपूर देखील उपस्थित होता.

  • राज ठाकरे आशुतोष गोवारीकरांना का भेटले?
  • राज ठाकरे आशुतोष गोवारीकरांना का भेटले?
  • राज ठाकरे आशुतोष गोवारीकरांना का भेटले?
SHARE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नुकतीच भेट घेतली. वांद्रे इथल्या त्यांच्या कार्यालयात ही भेट झाली. यावेळी अभिनेता अर्जुन कपूर देखील उपस्थित होता. या भेटीमागे नेमकं काय कारण हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. पण सध्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास चित्रपटामधून मांडत आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अर्जुन कपूर हा सदाशिवभाऊ पेशवा यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे. संजय दत्त अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे

'पानिपत' हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरवर प्रेक्षकांकडून काही प्रमाणात टीका करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे प्रदर्शनानंतरच कळेल.  हेही वाचा

पानिपतचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली अर्जुन कपूरची खिल्ली

पानिपतचा ट्रेलर पाहून आली बाजीराव मस्तानी, पद्मावतची आठवण


संबंधित विषय
ताज्या बातम्या