'बिग बॅास'च्या घरात स्मिता घालणार का बिकीनी?

काही कलाकार ‘पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते...’ करायला तयार असतात. ‘बिग बॅास’च्या घरातील स्मिता गोंदकरला तिच्या आईने जो सल्ला दिला तो ऐकून याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.

SHARE

‘भूमिकेसाठी वाट्टेल ते...’ असं म्हणत आजवर बऱ्याच कलाकारांनी विविध आव्हाने झेलत सिव्हरस्क्रीन गाजवली आहे. त्याचतऱ्हेने सध्या काही कलाकार ‘पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते...’ करायला तयार असतात. ‘बिग बॅास’च्या घरातील स्मिता गोंदकरला तिच्या आईने जो सल्ला दिला तो ऐकून याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.

अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या ‘बिग बॅास’मध्ये आपला जलवा दाखवत आहे. मागच्या आठवड्यात ‘बिग बॅास’ने घरातील सर्व सदस्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. यादरम्यान १२ जून रोजी ५८ व्या भागात स्मिताची आईही घरी गेली होती. सुरुवातीला स्मिताला मराठी बोलता येत नसल्याने तिचा तिरस्कार करू नका, असं सर्वांना समजावून सांगितलं. त्यावेळी घरातील सर्व सदस्य स्टॅच्यू होते.


आईचा सल्ला

थोड्या वेळाने ‘बिग बॅास’ने सर्वांना रिलीज केलं. त्यानंतर सर्वांनी स्मिताच्या आईची भेट घेतली. स्मिताचे अश्रू अनावर झाले. ते पुसत स्मिताची आई लडिवाळपणे तिला म्हणाली की, “स्विमींग करताना तू बिकीनी का नाही घालत. बिकीनी घालत जा.” त्यावर स्मिताने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.


जाता जाता पुन्हा आठवण

सर्वांची भेट घेऊन झाल्यावर बिग बॅासने स्मिताच्या आईला मुख्य दरवाजाने बाहेर जाण्याचा आदेश दिला. बाहेर पडत असताना स्मिताच्या आई पुन्हा तिच्याकडे पाहून “बिकीनी घाल”, असं म्हणाली.


संस्कृतीचा ऱ्हास

स्मिताच्या आईचं हे वर्तन कोणत्याही संस्कारक्षम व्यक्तीला खटकण्यासारखंच आहे. ‘बिग बॅास’ वेबसीरिज नसून टीव्ही शो आहे. हा शो सर्व वयोगटातील प्रेक्षक पाहतात. याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा साधा विचारही या सल्ल्यात नव्हता. संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची कुजबूज आता अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.


खरंच गरज आहे का?

सिनेमातही बिकीनी सीन दिले जातात, पण ते सारं कथानकाची गरज असल्याचं वाक्य तोंडावर फेकून दिग्दर्शक स्वत:चा बचाव करतो, पण इथे तसं नाही. बिकीनी घालणं ही ‘बिग बॅास’मध्ये राहण्यासाठी आवश्यक आहे की, चीप पब्लिसिटी मिळवून शो जिंकण्याची ही वृत्ती आहे?


मराठी अस्मितेसाठी घातक

ही वृत्ती मराठी अस्मितेसाठी घातक आहे. फुकटची पब्लिसिटी मिळवण्यासाठी एक आई जेव्हा आपल्या मुलीला बिकीनी घालायला सांगते तेव्हा मराठी अस्मिता जपणाऱ्यांची मान शरमेनं खाली गेल्याशिवाय राहात नाही.हेही वाचा-

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या

बिग बाॅस : पुष्कर, भूषण, मेघा होणार भावूक !संबंधित विषय
ताज्या बातम्या