Advertisement

देहांतचा मुहूर्त...


देहांतचा मुहूर्त...
SHARES

गिरगाव - निर्माते सदानंद (पप्पू) लाड यांच्या एल. जी प्रॉडक्शन निर्मित आणि अंकुर मुव्हीज प्रस्तुत देहांत या सामाजिक चित्रपटाचा मुहूर्त गिरगावातील प्रसिद्ध लाडाचा गणपती मंदिरात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यानंतर चित्रपटाचं चित्रिकरण गिरगावातील विविध ठिकाणी सुरू झालं आहे. प्रदीप म्हापसेकर लिखित आणि भगवानदास दिग्दर्शित या चित्रपटातून बालमनावर होणाऱ्या दुष्परिणामांना वेगळी वाट करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटात अशोक शिंदे, दीप्ती भागवत, सुप्रिया विनोद, अंकुर लाड, सुहृद वाडेकर, रश्मी राजपूत इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत असून, डीओपी संतोष यांची आहे. चित्रपटाला मधुर संगीत लहू माधव यांचे आहे. आजची पिढी मोबाईल व्हाट्सअॅपच्या अधीन चालली आहे. मुलांचा मैदानी खळांकडे कल उरला नाही. त्यांना पालक महागडे फोन घेऊन देतायेत, पण मुले त्याचा नेमका कसा वापर करीत आहेत? मोबाइल इंटरनेटवर कोणत्या लिंक्स पाहतात? याकडे अजिबात लक्ष नाहीये. आजच्या मुलांपेक्षा पालकांना अधिक सजग करण्याची गरज वाटल्याने या विषयाला हात घातला असल्याचे या चित्रपटाचे सहनिर्माते आणि कलाकार अंकुर लाड म्हणाले.
सर जे. जे. कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या भगवानदास यांची ही स्वतंत्ररीत्या निर्माण होणारी पहिलीच कलाकृती आहे. त्यांनी अनेक मान्यवरांसोबत असोशिएट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ते म्हणाले की, मनाजोगे कथानक आणि प्रदीप म्हापसेकर यांच्यासोबतचं ट्युनिंग यामुळे ही कलाकृती अधिकाधिक दर्जेदार करण्याचे बळ मिळत गेले. वेगळ्या विषयासाठी बराच स्ट्रगल करावा लागतो तो आम्हीही केला. लाड साहेबांमुळे तो कमी झाला असे म्हणता येईल. हा विषय भारतापुरताच मर्यादित नसून, जगात सर्वत्र सारखाच आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा