मुंबई - प्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन पुढील आठवड्यात मुंबईत येणार आहे. 'कुंग फू योगा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जॅकी मुंबईत येणार आहे. येत्या 3 फेब्रुवारीला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकीसह सोनू सूद, दिशा पटनी, अमायरा दस्तूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतातल्या इतर शहरांनाही भेटी देऊन जॅकी चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.