Advertisement

सोशल मीडियावर अमिषा पटेल का होतेय ट्रोल? वाचा


सोशल मीडियावर अमिषा पटेल का होतेय ट्रोल? वाचा
SHARES

कधीकाळी बॉलिवूडमधील देखण्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अमिषा पटेल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. खरेतर तिने टाकलेल्या एका फोटोमुळे ती सध्या चर्चेत आहे. 'कहो ना प्यार है' या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अमिषाने अभिनयाकडे पाठ फिरवलेली असताना फक्त एका फोटोमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा रंगत आहे.


'भैय्याजी सुपरहिट' सिनेमात दिसणार अमिषा

अमिषा पटेलने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो अपलोड केला होता. हा फोटो अपलोड करताच सोशल मीडियावर काही युजर्सनी तिची खिल्ली उडवली. तर काही युजर्सनी त्याच्या या फोटोची प्रशंसाही केली. अमिषा लवकरच सनी देओल आणि प्रिती झिंटा यांच्यासोबत 'भैयाजी सुपरहिट' या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement